संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह तालुक्यात सोमवारी दि २९ रोजी वट पौर्णिमा व्रत (वटसावित्री) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळ पासुनच सुवासिनीनी नटुनथटून वडाच्या झाडाखाली गर्दी केली होती.पतीच्या दीर्घायुष्यासाठी,उत्तम आरोग्य,अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे, हिंदु संस्कृतीतील पवित्र वट पौर्णिमाव्रतासाठी पारंपरिक वेशभूषा , नटलेला साज शृंगार,तसेच पाता। पुजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाची विधिवत पुजा केली.
खानापूर शहरातील मयेनगर, विद्यानगर, रेल्वेस्टेशन, शहरातील बाजार पेठ,मारुती नगर,वेगवेगळ्या उपनगरात तसेच प्रत्येक खेड्यात वडाच्या झाडाजवळ सकाळ पासुनच सुवासिनीची एकमेकीची ओटी भरत शुभेच्छांची देवेन घेवान केली.
पौराणिक मान्यतेनुसार सावित्रीने आपल्या पतीव्रतेच्या सामर्थ्याने यमराजकडुन पती सत्यवानचे प्राण परत मिळविले.या आदर्शातुन प्रेरणा घेत सुहासिनी सात जन्मी हाच पती लाभावा.पतीला निरोगी ,दीर्घ आणि सुखी आयुष्य लाभावे.अशी मनोभावे प्रार्थना करत वडाच्या झाडाभोवती प्रदेशक्षिणा घालत व्रताचे पालन करतात, वडाच्या पुजनाने आजची वटपौर्णिमा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली.
