खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील मराठा मंडळ हाय्यर सेंकडरी हायस्कूलच्या निवृत्त शिक्षकांचा सत्कार नुकताच पार पडला.
यामध्ये ज्येष्ठ शिक्षक जे.डी. बिर्जे, एस.डी. गुरव व शिपाई प्रताप देवळी यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक परशराम गुरव होते.
तसेच प्रमुख पाहुणे संचालक शिवाजीराव पाटील उपस्थित होते.
प्रारंभी श्रीमती एल बी जाधव यानी प्रास्ताविक केले.तर मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी संस्थेच्या संचालकांच्या हस्ते सत्कारमूर्तींचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मराठा मंडळ संस्थेच्या विविध शाळांमधून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक तसेच संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक आजी-माजी विद्यार्थी यांनी सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती जे.डी.बीर्जे म्हणाले की, मराठा मंडळ संस्थेने आपल्याला शिक्षक म्हणून संधी दिली त्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करू शकलो मी खूप नशीबवान आहे मला संस्थेचे संस्थापक कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर तसेच आजच्या संस्थेचे अध्यक्षा श्रीमती डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांचे सानिध्य लाभले त्यांच्याच कृपाशीर्वादाने मी संस्थेमध्ये तळमळीने विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला.असे विचार प्रगट केले.
तर सत्कारमूर्ती एस.डी. गुरव म्हणाले कि जीवनात शिक्षकी पेशाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. यावेळी मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी यांनी सेवानिवृत्त होत असलेल्या या त्रिमूर्ती बद्दल कृतज्ञता व्यक्त करून सेवानिवृत्त होत असलेले हे दोन्ही शिक्षक व शिपाई हे आम्ही चौघही वर्गमित्र असून असा योग अत्यंत दुर्मिळ येतो अशी भावना व्यक्त केली.
यावेळी जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन डी पाटील यांनी समायोजित विचार मांडले. या समारंभाला श्रीमती एलजी पाटील , श्रीमती एन के किल्लेकर, श्री संभाजीचे ,श्री सावंत , श्री. कदम ,श्री मेलगे ,तारा राणी स्कूलचे मुख्याध्यापक आर.एन जाधव , ए एन देसाई , हायस्कूलचा शिक्षकवर्ग, कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. भातकांडे यांनी केले. तर सत्कारमूर्तींचा परिचय आर टी टिकेकर यांनी केला. शेवटी आभार रेखा लक्केबैलकर यांनी मानले.
