#सहकार सप्ताह निमित्त खानापूर को-आँप,बँकेच्यावतीने वृक्षारोपन संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अलिकडे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे.निसर्ग टिकवायचा असेल व पाऊस पडायचा असेल तर प्रत्येकाने एक तरी झाड लावुन ते झाड जोपसले पाहिजे.यासाठी आपल्या आईच्या नावे झाड लावुन त्याची निगा राखा.
तसेच दि खानापूर को-आँप.बॅकेच्या आवारात वृक्षारोपण निमित्त लावण्यात आलेल्या रोपाची बॅकेच्या कर्मचार्यानी काळजी घेऊन ती वाढवा.असे मत दि खानापूर को-आँप.बँकेचे चेअरमन अमृत शेलार यानी सोमावारी दि.२९ रोजी केंद्र सहकार मंत्रालयाच्या ५व्या वर्धापन दिनानिमित्त सहकार सप्ताहाचे औचित्य साधुन वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी खानापूर तालुक्याचे आमदार यांच्याहस्ते रोप लावुन वृक्षरोपऩ कार्यक्रमाचे उदघाटन केले.
यावेळी आजी माजी आमदार ,चेअरमन अमृत शेलार, व्हाईस चेअरमन मेघशाम घाडी,जेष्ट संचालक परशराम गुरव,डाॅ.सी जी.पाटील,रमेश नार्वेकर,विजय गुरव, बाळासाहेब शेलार,अनिल बुरूड,दिपक चव्हाण ,विठ्ठल गुरव, मारूती बिलावर, तसेच संचालिका सौ.अंजली कोडोळी व सीडीओ सौ.पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी काटगी,महांतेश कोडोळी, बॅक कर्मचारी,पत्रकार ,इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक जनरल मॅनेजर विजय साळुंखे यानी करून उपस्थितांचे स्वागत केेले.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
तर उपस्थित मान्यवरांचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्य़वरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनरल मॅनेजर विजय साळुंखे यानी केले
आभार संचालक विजय गुरव यानी मानले.
