#वीज पुरवठा बंद, दैनदिन व्यवहार ठप्प!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका आहे.यातालुक्याच्या जंगलभागातील देगाव भागात नुकताच सुरू झालेल्या धुवाधार पावसाने विधुत खांब मोडुन पडले आहेत.देगावच्या रस्त्यावर जंगलातील झाडांच्या फांद्या पडुन पायवाट ही बंद झाली आहे.
याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार देगावचे सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे यानी केले आहे.
नुकताच देवगाव परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.यामुसळधार पावसाने देगाव गावच्या रस्त्यावर विधुत खांब कोसळल्याने याभागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रस्त्यावर झांडाच्या फांद्या कोसळुन रस्ता ही बंद झाला आहे.मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही.
संबधीत हेस्काॅम खात्याने तसेच वनखात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन विजपुरवठा सुरळीत करावा.रस्त्यावरील कोसळलेल्या फांद्या वनखात्याने मोकऴ्या करून रस्ता ये जा करण्यास सुरळीत करावा.अशी मागणी केली आहे.
