#चापगांव ग्रामस्थाचे निवेदन!
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता.खानापूर )गावात जेजेएम जल जीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या कामात बर्याच त्र्यूटी आणि निकृष्ट कामाचा दर्जा असल्याचा आरोप करत मा जी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले व गावकर्यानी तालुका पंचायत ईओ यानी चौकशी करावी. अशी निवेदनाव्दारे मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे, की ३ कोटी रूपयाचा निधी खर्चून जे जे एम योजना राबविण्यात आली असली तरी या योजनेतील अनेक कामे अर्धवट असल्याचे म्हटले आहे. या अर्धवट कामामुळे सबंधित कंत्राटदाराला एन ओ सी देऊ नये.सध्या परिस्थितीत कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.
चापगाव ग्रामस्थानी अदाजपत्रकानुसार सर्व कामे डाली आहेत का.याजबरोबर कामाचा दर्जा व तांत्रिक निकषाचे पालन झाले आहे का.याची तपासणी करावी,व कामाचे मुल्यमापऩ करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच ग्रामसभा आयोजित करून नागरीकांच्या तक्रारी, अभिप्राय,व सुचना जाणुन घ्यावात.अशी मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले एस डीएमसी अध्यक्ष मशनू चोपडे यल्लाप्पा कदम लक्ष्मण पाटील गणेश कदम बळवंत पाटील यल्लाप्पा पाटील जग्गू पाटील सुनील धबाले यल्लाप्पा धबाले मशनु सुतार लक्ष्मण मादार अर्जुन मादर विठ्ठल सुतार हनुमंत पाटील तम्मा मारीहाळ संजू मादर बाळू गुरव निंगाप्पा गुरवआदी उपस्थित होते.
