संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
महाराष्ट्रसह कर्नाटकात कुंभार समाज मोठ्या संख्येने वसला आहे. मात्र दिल्ली दरबारी आपल्या समाजाची नोंद नाही. देशात ८ कोटी कुंभार बांधव असल्याची नोंद दिल्ली दरबारी आहे. त्यामध्ये मारवाडी, गुजरातमधील कुंभार बांधव आघाडीवर आहे. केंद्र सरकारकडूक कलाकार ओळखपत्र ( अर्टिजिएस कार्ड) मिळवल्यास आपोआपच त्याची नोंद दिल्ली दरबारी होते. केंद्र शासनाच्या सोई देखील थेट कलाकारांना मिळण्यास मदत होते. त्यासाठी समाजातील १८ वर्षे वय उलटलेल्या प्रत्येक युवक, युवती ते वयोवृध्द नागरिकांनी कलाकार ओळखपत्र मिळवून घ्यावे. त्यासाठी दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ खानापूरतर्फे गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. त्याबरोबर कुंभार समाजाची जनगणना उपक्रम देखील हाती घेतला आहे.
कलाकार ओळखपत्र मिळवण्यासाठी फॉर्म दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार (फुलेवाडी) उपाध्यक्ष सोमनाथ कुंभार (गर्लगुंजी) यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्या शिवाय गर्लगुंजी गावातील गर्लगुंजी गावच्या माजी ग्राम पंचायत उपाध्यक्षा रेखा विनोद कुंभार यांच्याकडे फॉर्म मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगावसह खानापूर तालुक्यातील कुंभार समाजातील नागरिकांनी याचा लाभ घेवून मंडळाला सहकार्य करावे.
*कलाकार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
*आधारकार्ड झेरॉक्स
*चालू बँक खाते झेरॉक्स
*दोन पासपोर्ट साईज फोटो
कुंभार कुटुंब सर्व्हेसाठी एक आयडी साईज फोटो
सूचना : कुंभार कलाकार ओळखपत्र अर्ज इंग्रजीत कॅपीटल लेटरमध्ये भरणे आवश्यक आहे. आधारकार्डप्रमाणे अचून माहितीची भरणा करावी. कुणाला फॉर्म भरणे शक्य नसल्यास त्या व्यक्तीने आधारकार्ड, बँकपासबुक झेरॉक्स, दोन फोटो अर्जासोबत अर्जावर सही करुन मंडळाच्या सदस्यांकडे जमा करावे.असे आवाहन
परशराम पालकरसचिव : दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ खानापूर यानी केले आहे.
