#खानापूर म.ए.समितीचे आवाहन!
खानापूर, प्रतिनिधि
बेकायदा कन्नड सक्तीविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी गावागावांत जनजागृती वाढवून २२ जून रोजी बेळगाव येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले. तर तालुक्यातील युवा समिती सध्या करीत असलेले कार्य योग्य दिशेने असून त्यांच्या प्रत्येक कार्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील, असे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.खानापूर येथे सोमवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात गोपाळ देसाई यांनी सांगितले की, २२ जून रोजी बेळगाव मध्यवर्ती समितीने य बेकायदा कन्नड सक्तीविरोधात भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला असून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन पत्रक वाटप करावे. दुकाने, दूध डेअरी, संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती साहित्य पोहोचवून नागरिकांना आंदोलनाची माहिती द्यावी. तसेच २९ जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलनासाठीही पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आपल्या मनोगतात युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले. सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि शैक्षणिक प्रश्नांसाठी युवा कार्यकर्ते सातत्याने लढा देत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. तसेच बेळगाव येथील मोर्चा विषयी करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने जमा होण्याची आव्हान त्यांनी यावेळी केले. तसेच गुंजी येथील केपीएस शाळेच्या प्रश्नाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत एक लाख सह्या संकलन मोहिमेचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात ३० सह्या पुस्तिका वितरित करण्यात आल्या असून उर्वरित २० पुस्तिका लवकरात लवकर जमा करून मोहीम यशस्वी करण्याचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.
यावेळी धनंजय पाटील, बाळासाहेब शेलार, विलास बेळगावकर, राजाराम देसाई, रमेश धबाले, शंकर गावडा यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
बैठकीस चव्हाण, रुक्मण्णा झुंजवाडकर, रमेश धबाले, पुंडलिक नाकाडी, कृष्णा मनोळकर, डी. बी. पाटील, डी. एम. भोसले, अजित पाटील, संजीव पाटील, एन.एन. पावले, संदेश कोडचवाडकर, परशुराम पाटील, म्हात्रुं धबाले, शिवाजी पाटील, राजेंद्र कोलम, सुनील पाटील, लक्ष्मण पाटील, प्रमोद पाटील, आप्पासाहेब मुतगेकर, पुंडलिक पाटील, कृष्णा कुंभार ,पुंडलिक चव्हाण आदी उपस्थित होते.

