#गेली ४० वर्षे पोष्टखात्यात सेवा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता. खानापूर ) गावचे सुपूत्र व पोस्टमन ( ग्रामीण डाक सेवक) सुराप्पा कृष्णाजी पाटील हे गेली ४० वर्षे पोष्टखात्यात प्रामाणिक पणे सेवा करून शनिवारी दि. ३० मे रोजी सेवानिवृत्त झाले.
या निमित्त खानापूर शहरातील पोस्ट आँफिसमध्ये सेवानिवृत्त निमित्त सत्कार सोहळा पार पडला.
मणतुर्गा गावचे सुपूत्र सुराप्पा कृष्णाजी पाटील यांचा जन्म १ जून १९६७ रोजी झाला.लहानपणापासुन अतिशय हुशार म्हणून ओळखले जात होते.त्याचा प्राथमिक शिक्षण मंणतुर्गा ये थे झाले.तर त्यांचे माध्यमिक शिक्षण खानापूर येथील मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूल मध्ये झाले.शिक्षणाची आवड असुन गरीब व शेतकरी कुटूबामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही.म्हणून त्यानी टेलर व्यवसायाला सुरूवात केली. त्यानंतर त्यानी साउंड सिस्टीमचे सुध्दा काही दिवस काम केले.हे काम करत असतानाच त्याना २३ सप्टेंबर १९८६ रोजी पोष्टखात्यात सेवा करण्याची संधी मिळाली.गेली ४० वर्षे त्यानी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानुन मणतुर्गा, हारूरी,शेडगाळी,डोकेगाळी,शिंदोळी,
सावरगाळी,माणिकवाडी आदी खेड्यात ग्रामीण डाक सेवक (पोष्टमन ) म्हणून. काम केले.
सुरूवातीला गेली २०वर्षे सायकलीवरून सेवा केली.त्यानंतर दुचाकीवरून केली.
शालेय जीवनात ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते.त्याच बरोबर त्याना संगीत भजनाची आवड होती.त्यामुळे ते उत्कृष्ट गायक म्हणून खानापूर तालुक्यात परिचयाचे आहेत. संगीत भजनाबरोबर त्यानी नाटकात सुध्दा काम केले आहे.
अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या सूरा प्रा पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा खानापूर पोस्ट आँफिसमध्ये पार पडला.
यावेळी खानापूर तालुका पोस्ट खात्याच्या वतीने तसेच विविध संघ ,संस्थाच्यावतीने शाल, पुष्पहार,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूर पोष्टआँफिसचे अधिकारी नारायण जाधव,अर्बन बॅकेचे चेअरमन अमृत शेलार,मष्णू चोर्लेकर, ए बी मुरगोड,एन एम पाटील,गोपाल हेब्बाळकर, वसंत गुंडपीकर, सुधीर पाटील,नारायण पाटील,नागेश पाटील,मर्याप्पा पाटील ,शंकर गावडा,ईश्वर बोबाटे,प्रल्हाद मादार,धर्माजी नंद्रणकर,प्रकाश गुरव,कृष्णा देवलतकर, मुख्याध्यापक शिवाजी भक्तुरी, तसेच पोष्टखात्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पोष्टखात्याचे श्रीपाद शिवोलकर यानी मानले.
