संदेश क्रांती न्यूज:
खानापूरप्रतिनिधी
खानापूरच्या नूतन ए.सी.एफ पदी बेळगाव विभागाचे ए सी एफ बसवराज वाळद यांची नुकताच नियुक्ती करण्यात आली आहे.तर खानापूरच्या ए सी एफ सुनीता निंबारगी यांची बदली धारवाड़ येथे करण्यात आली.
खानापूरचे नूतन ए सी एफ बसवराज वाळद हे यापूर्वी खानापूर तालुक्यात परिक्षेत्र वनअधिकारी ( आर एफ ओ) म्हणून सेवा बजावली आहे.त्यामुळे त्याना खानापूर तालुक्यातील कामकाजाचा चांगलाच अनुभव आहे. खानापूर तालुक्याशी त्याचे नातं आगदी जवळच आहे.आतातर त्याची ए सी एफ म्हणून बदली झाल्याने खानापूर तालुक्यातील नागरीकातुन तसेच पर्यावरण प्रेमीतुन तसेच वनविभागातील कर्मचार्यातुन समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यापुढे खानापूर तालुक्यातील जंगल
भागातील खेड्यातील नागरीकाना मोठे सहाय्य मिळणार आहे.तसेच त्याच्याकडुन आपल्या कार्यकाळात विविध वन संवर्धन उपक्रम राबवुन खानापूर तालुक्याचे नाव उज्वल करतील. आशी आशा तालुका वासीयांची आहे.

