संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या नगरपंचायतीच्या महिला अधिकारी सौ. शोभा पत्तार ( वय.५३) याचे गुरूवारी दि. २८ रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्याने बे लगाव येथील खासगी दवाखाण्यात निधन झाले.
सौ.शोभा पत्तार खानापूर नगरपंचायतीच्या
कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासुन प्रामाणिक सेवा बजावत होत्या.त्याच्या निधनाने खानापूर शहरातुन हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचे जन्मगाव कल्लोळ ( ता.गोकाक) , तर सासर बादामी जिल्हा बागलकोट ये थे आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार बदामी ये थे होणार आहेत .