#कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शालेय जीवनात अभ्यास करताना भविष्यात चांगले ध्येय ठेवून वाट चाल करावी.तरच विद्यार्थी यशस्वी होतील.अलिकडे विद्यार्थ्याना शिक्षणासाठी नव नवीन मार्ग मिळत आहे.तेव्हा विद्यार्थ्यानी शिक्षणाची निवड करताना ध्येय, महत्वकांशा उराशी बाळगुन प्रवेश घ्यावा.तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल.आपल्याला झेपत असलेला अभ्यास क्रम निवडा.ना ही तर पश्चाताप करण्याची वेळ आहे.आजच्या शिक्षणपध्दतीत मोठी सुधारणा झाली आहे.विद्यार्थ्याच्या अंगी मेहनत ,जीद्द, विश्वास असेल तर यश नक्कीच मिळेल व आयुष्यात यशस्वी व्हाल. असे मार्गदर्शन राणी चन्नमा युनिवर्सिटी असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.डी.एन.मिसाळे यानी खानापूरात राजा श्री दक्ष सोशल फाउंडेशनच्यावतीने लोकमान्य भवनात आयोजित गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे यानात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड होते.
यावेळी बोलताना डाॅ.मिसाळे म्हणाले की.यंदा खानापूर तालुक्यातील १० वीच्या विद्यार्थीनीने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.तेव्हा खानापूर तालुक्यातील हे हुषार आहेत.त्याना शिक्षणाचा चांगला मार्ग मिळणे गरजेच आहे.
प्रारंभी मुख्याध्यापक रघुनाथ उत्तुरकर यानी प्रास्ताविक केले.तर शिक्षक बाळकृष्ण.कुंभार व नंदु कुंभार यांनी स्वागत गीत सादर केले.
व्यासपिठावर एम डी.सदानंद पाटील,खानापूर तालुका संत गोरोबा काका मंडळाचे अध्यक्ष भैरू कुंभार,
प्राध्यापक परशराम कुंभार,रामनगर काॅलेजच्या प्राध्यापिका सौ.भारती कुंभार, दिगंबर गुंजीकर,कुंभार समाजातील जेष्ठ नागरीक मोहन कुंभार,सौ.आशा कुंभार,भगवंत कोवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजनाने झाली. उपस्थित पाहुण्याचे शाल,मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कुंभार समाजातील इयत्ता १० वी , १२ वी,तसेच पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्याचा तसेच बढती मुख्याध्यापकाचा शाल,मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. अध्यक्षिय भाषणात निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के.जी.कुंभार यानी केले.तर आभार पुंडलिक कुंभार यानी मानले.

