संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गुंजी, लोंढा, नागरगाळी परिसरात हेस्काॅम च्यावतीने महत्वाच्या दुरूस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात आल्याने दोन शनिवारी वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहेत.
यामध्ये उद्यान शनिवारी दि.१६मे व पुढील शनिवारी दि.२३ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत यावेळेत. वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
तेव्हा या भागातील नागरीकानी तसेच शेतकर्यानी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.तसेच हेस्काॅम खात्याला सहकार्य करावे.असे आवाहन हेस्काॅम खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.


