संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शिवठाण ( ता. खानापूर ) ये थे नव्याने बांधण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या रविवारी दि.१० रोजी सकाळी होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदारी मिराशी उपस्थित राहणार आहेत.
तर स्वागताध्यक्ष मष्णू शिरोडकर असुन मंदिराचा लोकार्पण सोहळा आमदार विठ्ठल हलगेकर सपत्नीक यांच्या हस्ते होणार आहे.गाभारा लोकार्पण मा जी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
तर दीप प्रज्वलन भाजपा राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी, राज्य महिला मोर्चा ,भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई व इतर मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन उपस्थित मान्यवराच्याहस्ते होणार आहे.
तरी कार्यक्रमाला सर्वीनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.