#गुरूवार ते रविवार पर्यतविविध कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मच्छे ( ता.बेळगाव ) येथील नेहरूनगरात कै गोपाळ बाबूराव देसाई यानी निर्माण केलेल्या मंदिरात श्री गुरूदेव दत्त मूर्ती पुन: प्रतिष्ठापना सोहळ्याला आज गुरूवारी दि.७ पासुन प्रारंभ होत आहे.
आज गुरूवारी दि.७ रोजी सायंकाळी लक्ष्मीनगर गणपती मंदिर येथून नेहरू नगर दत्त काॅलनी पर्यत दत्त महाराज पादुका मिरवणूकीला सुरूवात होऊन कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.
उद्या शुक्रवारी दि.८ रोजी संध्याकाळी भजन कार्यक्रम होणार आहे.तर शनिवारी दि. ९ मे रोजी होम वहन व कलश पूजन हो मार आहे.तर रविवारी दि. १० मे रोजी सकाळी ७ ते १२ यावेळेत पुन:प्रतिष्ठापना,पुजाविधी व महा आरती होऊन रात्री ८ वाजता महाप्रसादाचे आयोजन होणार आहे.तरी सर्वानी कार्यक्रमाला उपस्थित राहुन प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन राजू गोपाळ देसाई व सौ.तेजस्विनी राजू देसाई यानी केले आहे.

