संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील बेळगांंव खानापूर महामार्गावरील जांबोटी क्राॅसजवळील डाॅ.बाबसाहेब आंबेडकर गार्डनच्या बाजुला असलेल्या गणेश मंदिरात मंगळवारी दि.५ मे.रोजी अंगारकी संकष्टीनिमित्त गणेश पुजनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रारंभी सकाळ पुरोहित सुनिल नाईक यानी गणेश मुर्तीला विधीवतअभिषेक,विशेष पुजा केल्यानंतर सकाळ पासुन संध्याकाळ्पर्यत गणेश भक्तानी गणेशाचे दर्शन घेऊन अभिषेक घातले.यावेळी विशेष पुजेचे आयोजन केले होते.

