१५ वर्षाच्या कालावधीनतंर लक्ष्मी यात्रेचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सरदेसाई जांबोटीकर संस्थानिकांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बैलूर , बाकनूर, मोरब व देवाचीहट्टी या चार गावातील १५ वर्षांनी आलेली श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उद्यान बुधवारी दि.६ मे ते गुरू वा री दि. १४ मे पर्यंत पार पडणार आहे. जांबोटी संस्थान चे मूळ कुलदेवता देवस्थान श्री चौऱ्यांशी पावणाई देवी हे बैलूर या गावी आहे. संस्थान क्षेत्रातील चौऱ्यांशी गावांमध्ये होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवी यात्रांमध्ये परंपरेनुसार जांबोटीकर संस्थानीकांना पहिला मान ही आजतागायत चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार आताचे सांस्थानिक श्रीमंत सरकार कर्णसिंह सरदेसाई जांबेटीकर व श्रीमंत राणीसरकार सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर ह्या उभयतांच्या हस्ते पहाटे पाच वाजता विधीवत धार्मिक कार्याला सुरुवात होणार आहे.
अशी माहिती श्रीमंत सरकार कर्णसिंह सरदेसाई यानी दिली.
तरी यात्रेला सर्वानी मोठ्यासंख्येने उपस्थित राहुन यात्रेची शोभा वाढवावी.असे आवाहन श्रीमहालक्ष्मी यात्रोत्सव कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.