संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सन २०२५-२६सालच्या एसएसएलसी वार्षिक परीक्षेत शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार उद्या
सोमवार दि ४ मे. रोजी दहा वाजता खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडिएम हायस्कूल, येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी ई ओ पी. रामाप्पा, उपस्थित राहणार आहेत.तर
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव हालगेकर, तहसीलदार दुंडप्पा कोमार, डी डी पी आय.श्रीमती लीलावती हिरेमठ, उपसंचालक, शा.शि.विभाग, बेळगाव (दि).
अशोककुमार सिंदगी उपसंचालक (अ) डाएट मन्नूर बेळगाव.
रमेश मेत्री कार्यकारी अधिकारी तालुका पंचायत खानापूर.
एस. एस. हिरेमठ, शिक्षणाधिकारी, बेळगाव. (जिल्हा एसएसएलसी नोडल अधिकारी), क्षेत्र समन्वयाधिकारी
तालुका हायस्कूल संघटनांचे अध्यक्ष,सचिव आणि पदाधिकारी. तसेच एस.एस.एल.सी तालुका नोडल अधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहाण्याचे आवाहन बी ई ओ कार्यालय व बी आर सी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.