#निवेदनाव्दारे मागणी !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर बेळगाव गर्लगुंजी आणि खानापूर गर्लगुंजी बसेस मध्ये अनियमितता आढळून आली. आणि बेळगाव खानापूर येथे प्रशिक्षनाला जाणारे विद्यार्थी तसेच कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांचे आणि त्रास होऊ लागले. ही समस्या गर्लगुंजी माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी खानापूर डेपो मॅनेजर आणि बेळगाव. डी टी ओ यांना सांगितल्या होत्या. त्यानुसार बसेस पूर्वरत चालू झाल्या पण तालुक्यातील आणि जिल्ह्यातील यात्रा आणि इतर निमित्ताने बसेसची एकाधी फेरी बंद केली जात आहे. त्यामुळे बेळगाव डी टी ओ आणि खानापूर बस डेपो व्यवस्थापक संतोष यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, माऊली देवी यात्रा काळात या भागात बसेस वाढवा आणि पूर्वी चालू असलेल्या बसेस सुरळीत चालू ठेवा जेणेकरून ट्युशन आणि कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थांना त्रास होणार नाही तसेच बेळगाव खानापूर ला जाणारा कामगार वर्ग वेळेत पोहचेल.
निवेदन देताना गर्लगुंजी माजी ग्रा.प.सदस्य प्रसाद पाटील ,रामचंद्र लोहार,परशराम बेळगावकर, सतीश बुरुड,विजय लोहार उपस्थित होते.
या वेळी निवेदनाचा स्विकार करून डेपो मॅनेजर संतोष यांनी सुधा बेळगाव बस डेपो क्रमांक 3 शी संपर्क साधला.बेळगाव डी टी ओ यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
