#कराटे परीक्षेत ३६ विद्यार्थ्याचा सहभाग!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कराटे कलर बेल्ट परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. डी. ई. नाडगौडा, उपस्थित होते.तर अतिथी म्हणून अँडमिन दिव्या नाडगौडा, प्राचार्य बालकृष्ण हलगेकर उपस्थित होते.
तसेच प्रमुख बेल्ट परीक्षक मास्टर गजेंद्र बी. काकतीकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने कराटे कलरबेल्ट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
या परीक्षेस एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी आपली शिस्त, मेहनत आणि कराटे कौशल्य उत्कृष्टपणे सादर केले.
