#केवळ दोनवर्षाच्या कार्यकाळातच बदली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका नेहमी वनखात्याच्या कार्याबद्दल चर्चेत असतो.संध्या खानापूर तालुक्यात केवळ दोन वर्षाचा सेवा कार्यकाळ केलेल्या तीन आर एफ ओ च्या खानापूर तालुका अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
, केवळ दोनच वर्षे सेवा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सरकारने या वनअधिकार्याच्या कार्यरत असलेल्या ठिकाणाहुन अन्यत्र बदल्या केल्या आहेत.
यामध्ये खानापूरचे आर एफ ओ श्रीकांत पाटील यांची खानापूर तालुका सामाजिक वनीकरण विभागात आरएफओ पदी बदली झाली आहे, तर सामाजिक वनीकरण विभागाचे आर एफ ओ मृत्युंजय गणाचारी यांची लोंढा विभागाचे आरएफओ म्हणून बदली करण्यात आली आहे.तसेच लोंढा विभागाचे आरएफओ तेज वाय पी याची खानापूर आर एफ ओ म्हणून बदली करण्यात आली आहे.
वन तसेच पर्यावरण विभागाचे उप्पर मुख्य सचिव बी. व्येकटेश यानी नुकताच या बाबतचे आदेश जारी केले आहेत.
खानापूर आरएफओ श्रीकांत पाटील तालुक्याच्या पश्चिम भागात आरएफओ म्हणून सेवा करताना विविध उपक्रम राबवून लोकांची मने जिंकली आहेत.एक कर्तबगार आरएफओ म्हणून श्रीकांत पाटील याच्याकडे पाहिले जाते. तसेच लोढा आरएफओ तेज पी वाय यानी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली आहे.
परंतु केवळ दोनच वर्षाची सेवा कार्यकाळ पूर्ण करताच त्याची बदली झाली.याची खानापूर तालुक्यात चर्चा सुरू आहे. मात्र खानापूर तालुक्यातच ते आर एफ ओ सेवा करणार आहेत.
