#खानापूर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर दादमी यांचे आवाहन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति जंगलमय तालुका आहे.त्यामुळे तालुक्यातील जनावराची जोपना करणे अंत्यत गरजेचे आहे.यासाठी जनावराना लाग रोगीची, व लंपी रोगाची लस देणे गरजेचे आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावात लाग रोगीची व लंपी रोगीची लस पशु खात्याच्यावतीने देण्यात येत आहे.याचा लाभ शेतकरी वर्गाने घ्यावा. दुभत्या जनावराना लस देण्यास शेतकरी दुर्लक्ष करतात.कारण लस दिल्या नंतर जनावरे दुध कमी देतात हा गैरसमज आहे.कारण जनावराना रोगापासुन दुर ठेवण्यासाठी लस देणे गरजेचे आहे., तेव्हा नचुकता लस देण्याचे आवाहन खानापूर पशु खात्याचे वैद्याधिकारी डाँ.मनोहर दादमी यानी केले.
या वेळी ते म्हणाले की, सध्या कडक उन्हाळा आहे.तेव्हा शेतकरी बंधूनी शिवारात जोत काम करताना जनावराची काळजी घेणे गरजेचे आहे.तेव्हा शेतात पहाटे पासुन दुपारी ११ वाजेपर्यत जोत काम करावे.कडक उन्हात जोत काम करू नये.भर उन्हात जोत काम केल्यास जनावराना अँटक येऊ शकतो. तेव्हा सायंकाळी ४नंतर ७ वाजेपर्यत जोत करण्यास हरकत नाही. यासाठी भर उन्हात जोत काम करू नका.असे आवाहन करण्यात आले आहे.
खानापूर पशुखात्यात कर्मचार्याची सख्या कमी!
खानापूर पशु खात्यात ५९ कर्मचार्या पैकी केवळ २२ कर्मचारी कार्यरत आहेत . केवळ ५० टक्के कर्मचारी काम करतात.त्यामुळे पशु खात्याला तालुक्यात काम करणे तारेवरची कसरत होत आहे.
खानापूर पशुखात्याकडे एक वाहन सुध्दा नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. तेव्हा शासनाकडुन खानापूर पशु खात्याला कायमस्वरूपी कर्मचारी तसेच कायमस्वरूप वाहनाची सोय व्हावी. अशी मागणी होत आहे.
