संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गुंजी गावच्या शेतकरी कुटूंबाचे रविवारी दि.५ रोजी शाॅर्टसर्किटमुळे आग लागुन लाखोचे नुकसान झाले.
या आगीत शंकर घाडी यांचे राहते घर जळुन खाक झाले.आगीत ६० हजार रूपयाची रोकड जळुन गेली,आगीत संसारोपयोगी साहित्य, दागीणे, धान्य जळुन खाक झाले. त्यामुळे घाडी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
या घटनेची माहिती मिळताच तालुक्याच्या आजी , माजी आमदारानी गुंजी गावाला भेट देऊन घाडी कुंटूंबाचे सात्वन केले.व जळालेल्या घराची पाहणी केली.
यावेळी आजी आमदारानी घाडी कुटूंबाच्या घराला पत्र्याचे छत घालुन आश्रा देण्याबदल सांगीतले, तर सरकारकडुन आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
तसेच माजी आमदारानी सुध्दा घटनेची माहिती मिळताच गुंजीतील नुकसान ग्रस्त घाडी कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले.व त्याना आर्थिक मदत म्हणून दहा हजार
रूपयाची रक्कम देऊ केली.
सरकार दरबारी प्रयत्न करून आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले.
या वेळी गावातील भाजप नेते पंकज कुट्रे, नेताजी घाडी, मुरलीधर घाडी तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.
तालुक्यात आडचणीच्या प्रसंगी धावुन संकटात सापडलेल्या कुटूंबाना धीर दिल्या बद्दल आजी, माजी आमदारांच्या बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
