संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गेल्या २५ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या विठ्ठलरखुमाई मंदिराच्या रौप्य
महोत्सवानिमित्त सभामंडपाचा जीर्णोध्दार सोहळा व लोक जागृतीचा जागर कार्यक्रम नागुर्डा (ता. खानापूर) येथे नुकताच पार
पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पूजारी तानाजी चापगावकर होते.
कार्यक्रमाची सुरूवात जयराज चापगावकर यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. यावेळी व्यासपिठावर आमदार विठ्ठल हलगेकर, ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर,भाजप युवा नेते पंडित ओगले,सदानंद होसुरकर,भरमानी पाटील,अर्बन बॅक चेअरमन अमृत शेलार,संचालक बाळासाहेब शेलार, काॅग्रेस नेते इरफान तालिकोटी, प्रसाद पाटील,ए. बी .मुरगोड,आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार विजेते आबासाहेब दळवी,बाळू बीर्जे,तुकाराम कुलम ,राज्य शिक्षक संघटना कार्यदर्शी के.एच.कौदलकर,एन पी एस संघ अध्यक्ष रमेश कवळेकर,मुख्याध्यापक बबन पाटील,मष्णू चॊर्लेकर,प्रल्हाद सुतार,महेश हेब्बाळकर तसेच प्रमुख वक्त म्हणून अजीत सावंत आदी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
तर सभामंपाचे भुमीपुजन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच देणगी पुस्तकाचे आनावर पाहुण्याच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवराना मान चिन्ह व पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले.
य़ावेळी एस डी एम सी कमिटी,दुध उत्पादक कमिटीच्या सदस्यांचा व भारतीय सैनिकाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन शाहीर अभिजीत कालेकर लिखित नाट्यप्रयोग लोकसंस्कृतीचा जागर हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक बी बी चापगावकर यानी केले.,आभार राजू कुंभार यानी मानले.
