संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या दु:खद निधना बद्दल त्याना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन रविवारी दि.२२ मार्च रोजी दुपारी २ वाजता शिव स्मारक सभागृहात करण्यात आले आहे.
यावेळी मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या मासिक बैठकीत तालुक्यातील विविध विषयावर तसेच आगामी कार्यक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
तेव्हा बैठकीला समितीच्या पदाधिकार्यानी तसेच कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार. दिगंबर पाटील ,समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील , निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यानी केले आहे.
