#कर्नाटक राज्य नेटबाॅल संघाचे करणार प्रतिनिधित्व!
#बीईओ. पी.रामाप्पा यांच्याहस्ते सत्कार,!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची नेटबाॅल खेळांडु अदिती डी.नाडगौडा हिची कर्नाटक राज्य ज्युनिअर १९ वर्षाखालील नेटबाॅल संघात निवड झाली आहे.
या निमित्त खानापूर बीईओ कार्यालयाच्यावतीने बुधवारी दि.११ रोजी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बीईओ पी.रामाप्पा यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी समन्वय अधिकारी मंजुनाथ,संतोष, शंकर कम्मार तसेच समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे सचीव डाॅ.डी.ई.नाडगौडा आदी उपस्थित होते.,
कर्नाटकाच्या अँमेच्योर नॅटबाॅल असोसिएशनने राज्यात नेटबाॅल संघाची निवड केली. या निवडीत कर्नाटक राज्य नेटबाॅल संघासाठी निवड झाली.कर्नाटक राज्यातील अनेक प्रतिभावंत १९ वर्षाखालील नेटबाॅल खेळाडु उपस्थित होते.
मात्र खानापूर समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची अदिती डी.नाडगौडा ही केवळ १२ वर्षाची खेळाडु तिच्या कौशल्याच्या जोरावर , उत्कृष्ट खेळामुळे तिची चाचण्यादरम्यान निवड झाली.
आता अदिती डी.नाडगौडा ही येत्या २३ मार्च ते २८ मार्च दरम्यान उत्तर प्रदेशातील मेरठा ये थे होणार्या १९ वर्षाखालील ज्युनिअर राष्ट्रीय नेटबाॅल संघाचे कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
देशभरातील अनेक नेटबाॅल संघ या १९ वर्षाखालील ज्युनिअर राष्ट्रीय नेटबाॅल स्पर्धेत भाग घेणार आहेत.
अदिती डी.नाडगौडा हिने मिळविलेल्या य़शाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अदिती डी नाडगौडा ही खानापूर डाँक्टर असोसिएशन चेअरमन व समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे सचिव डाॅ. डी.ई.नाडगौडा व समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अँडमिन सौ दिव्या डी.नाडगौडा यांची कन्या होय.
कोच व मुख्याध्यापक बालकृष्ण हलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
