भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी #संजय कुबल यांची निवड झाल्यानिमित्त छत्रिय मराठा समाजाच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर भाजप पक्षात गेली ३५ वर्षे पक्षाची धुरा सांभळत छत्रीय मराठा समाजाचे कार्य करणारे संजय कुबल याना भाजप पक्षाच्यावतीने बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष पदी निवड झाली.याचा आम्हा छत्रीय मराठा समा जा च्या वतीने सार्थ अभिमान आहे.
ऐवढेच नव्हे तर एका एक छत्रीय मराठा समाजाचा नेता म्हणून संजय कुबल यांच्याकडे पाहिले पाहिजे.अशा खंबीर नेत्रृत्व असलेल्या छत्रिय मराठा समा जा च्या नेत्याला १५ लाख छत्रीय मराठा समाज बांधवानी संजय कुबल याना एखाद्या एम एल सी अथवा मोठ्या पदावर ने ऊन ठेवले पाहिजे.इतका छत्रिय मराठा समाज विखूरलेला आहे.तेव्हा भविष्यात अशा पदावर त्याची निवड व्हावी .अशी सदिच्छा बेळगाव जिल्हा छत्रिय मराठा समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यानी मंगळवारी दि.१० रोजी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात “खानापूर व बेळगाव जिल्हा छत्रीय मराठा समाजाच्यावतीने भाजपा जिल्हा उपाक्षपदी निवड झाल्यानिमित्त संजय कुबल याच्या सत्कार करताना व्यक्त केले.
या वेळी बेळगाव जिल्हा छत्रिय मराठा समाजाचे जनरल सेक्रेट्ररी संजय भोसले,दक्षिण ग्रामीणचे अध्यक्ष सतीश बाचीकर, डी.बी.पाटील तसेच खानापूर पी एल डी बॅकेचे चेअरमन मुरलीधर पाटील,
नेते प्रकाश चव्हाण,भाजपचे तालुका सेक्रेट्ररी गुंडू तोपिनकट्टी,सदानंद मासेकर,राजू जांबोटकर,बाळू सावंत ,राजेंद्र रायका,भाग्यलक्ष्मी सोसायटीचे संचालक शामराव पाटील आदी ने ते मंड़ळी उपस्थित होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी संजय कुबल यांची निवड झाल्याबद्दल शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी मुरलीधर पाटील, बाळू सावंत,संजय भोसले यानी संजय कुबल यांच्याकडे कार्याचे कौतुक केले.
तर सत्कर मुर्ती संजय कुबल यानी सत्काराबदल कृतज्ञता व्यक्त केली.

