#आगीत संसार उपयोगी साहित्य,कपडे,फर्निचर,टीव्ही, धान्य , सोने चांदीचे दागीने जळून खाक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप (ता.खानापूर ) येथील स्वाती संतोष कुंभार यांच्या घराला सोमवारी दि.९ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागुन घर संपूर्ण जळुन खाक झाले.
आगीत दहा लाख रूपयाचे नुकसान डाले आहे.
सोमवारी सायंकाळी स्वाती कुंभार या शेतातुन घरी आल्या त्याचवेळी घरातुन अचानक धुराचा लोट आला. आणि बघता बघता आगीचा भडका उडाला.त्याचवेळी स्वाती यानी आरडाओरड करताच शेजारी लोक धाऊन आले. इतक्यात आगीने रूद्ररूप धारण केले.आग मोठ्या प्रमाणात भडकली.गावातील नागरीकानी आग विजण्याचा आटोकाट प्रयत्न केला.मात्र आगीने चारी बाजुने घेरले.लागलीच आग्निशामक दलाच्या जवानाना पाचरन करण्यात आले.
लागलीच अग्निशमक दलाच्या जवानानी घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नानी आग विजविण्याचाप्रयत्न केला.
स्वाती कुंभार याचे कौलारू घर असल्याने आगीने अधिकच रुद्र रूप घेतले.त्यामुळे आग आटोक्यात ये ऊ शक ली नाही.
मात्र आग्नीशमक दलाच्या जवानाच्या व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आजूबाजुच्या घराना आगीपासुन वाचविण्यात यश आले.
मात्र स्वाती कुंभार याचे संपूर्ण घर आ गीत जऴून खाक झाले.यात त्याचे जवळपास दहा लाखाचे नुकसान झाले.
नुकसान ग्रस्थानाशासनाकडुन आर्थिक मदत व्हावी.अशी मागणी सिंगीनकोप नागरीकातुन होत आहे.
