संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात गेल्या कित्येक वर्षापासुन कायमस्वरूपी सरकारी जागेवर फिश मार्केट नाही.त्यामुळे मासे विक्रेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
यासाठी खानापूर शहरातील मासे विक्रीदारानी मल्लेशी पोळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दुंडाप्पा कोमार व चीफ आँफिसर संतोष कुरबेट यांच्याकडे शहरातील सरकारी तीन जागेची पाहणी केली.व एका जागेवर कायमस्वरूपी फिश मार्केट करा अशी मागणी केली.
येत्या सोमवार पर्यत फिश मार्केटच्या जागेपर्यत निर्णय घ्या. अन्यथा खानापूर बंदची हाक दिली जाईल!
नुकताच चीफ आँफिसर संतोष कुरबेट यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तीन ठिकाणच्या सरकारी जागेची पाहणी केली.यामध्ये खानापूर जांबोटी रोडवरील अँग्रीकल्चर आँफिस व सी डी पी ओ आँफिस मधील माळजागा,त्याचबरोबर खानापुर पारिश्वाड रोडवरील बसस्टॅड मागील लक्ष्मीनगर क्राॅस जवळील सरकारी जागेवर, तसेच बेळगाव पणजी महामार्गावरील हेस्काॅम कार्यालयाच्या समोरील पी डब्ल्यू डी खात्याची जागा यातील एका जागेवर कायमस्वरूपी फिश मार्केट लवकरात लवकर करण्याचा निर्णय घ्या.तो पर्यत मासे विक्री दुकाने बंद राहतील.
यासाठी येत्या सोमवारी दि १६ पर्यत निर्णय झाला नाही तो खानापूर बंद ची हाक देण्यात येईल.अशी माहिती मासे विक्रीसंघाचे प्रमुख मल्लेशी पाळ
यानी दिली आहे.
तेव्हा खानापूरात लवकरात लवकर कायमस्वरूपी फिश मार्केट होण्याची अशा व्यक्त करण्यात येत आहे.
