संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील संताचे गाव म्हणून ओळखणार्या कुप्पटगीरी गावात संगीत भजन स्पर्धा नुकताच पार पडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रतिष्ठित नागरिक माजी सैनिक भाऊ पाटील होते.
व्यासपिठावर आमदार विठ्ठल हलगेकर,भाजपा राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी,गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील,भाजप तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी,खानापूर को-आँप बॅक चेअरमन अमृत शेलार, भाजप नेते माजी अध्यक्ष संजय कुबल,युवा नेते पंडित ओगले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या भजनस्पर्धाचे उदघाटन झाले.तर उपस्थित मान्यवरच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले .
या वेळी बोलताना भाजपा राज्य
कार्यकारणी सदस्य प्रमोद को चेरी म्हणाले भजन हे माणसाला भक्ती देणारे साधण आहे.पूर्वी गावोगावी भजनी मंडळे मोठ्या प्रमाणात असायची त्यामुळे लोकाना भजनी भारूडांची ओढ असायची, अलीकडे भजनी भारूडे मंडळी कमी होत चालली आहे.कारण आजच्या युवा पिढीच्या हातात मोबाईल आला भजनाची ओढ कमी झाली.
परंतु आजच्या युवा पिढीला मोबाईलच्या मागे जास्त न पळता भक्ती मार्गाकडे वळा.जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.असा उपदेश केला.
या वेळी आम दा रानी बोलता ना सांगीतले की भजन स्पर्धा या अलीकडे कमी होत चाललेत.पंरतु गावात भजन होत असेल तर गावात शांतता व भक्तीचे वातावरण निर्माण होते. तेव्हा गा वो गा वी मंदिरात भजन होणे ही आजच्या काळाची गरज आहे.
या वेळी विजयी भजनी मंडळे अनुक्रमे संत तुकाराम भजनी मंडळ माणगाव,गुरू मा ऊ ली भजनी मंडळ गोरंबे,श्री विठ्ठलरूखमाई संगीत भजनी मंडळ कुप्पटगिरी,श्री देवचव्हाटा भजनी मंडऴ केंचेवाडी,श्री शिव गणेश भजनी मंडळ दारोळी,श्री रामकृष्ण हरी भजनी मंडळ जांबोटी, श्री विठ्ठलरूखमाई भजनी मंडळ बेळेभाट,श्री जय हनुमान भजनी मंडळ करंजगाव,श्री गौळदेव भजनी मंडळ जट्टेवाडी आदी होत.
उत्कृष्ट गायक मयुर सुतार गोरंबे,उत्कृष्ट तब ला वादक बेळेभाट,उत्कृष्ट हार्मोनियम. सृष्टी पाटील कल्लेहोळ याना बक्षिस दे ऊन गैरविण्यात आले.
