#लोकायुक्तांच्या जनसंपर्क सभेत अनेक समस्यावर चर्चा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर मध्ये एका सरकारी वीस गुंठे जागेवर अतिक्रमण करून एक धार्मिक बांधकाम केले आहे या संबंधात 2011 सालापासून मी जयंत तिनेईकर तक्रार करत होतो यामध्ये मी तक्रार करत असल्याकारणाने माझा काटा काढण्यासाठी माझ्यावर ॲट्रॉसिटी केस दाखल करण्यात आले. दुसऱ्या एका जागेच्या संबंधात मी तक्रार केल्यामुळे माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तरी मी कायम समाज विघातक कृत्याविरुद्ध आवाज उठवत आलोय खानापूर मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बेकायदेशीर धार्मिक बांधकाम करण्यात आले आहे प्रत्यक्षामध्ये सरकारी नियमानुसार गटारपासून दोन मीटर आत मध्ये हे बांधकाम करायचा नियम आहे पण या ठिकाणी गटर सोडूनही दीड मीटर रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे म्हणजेच एकूण साडेतीन मीटर हे बांधकाम बेकायदेशीर आहे कायद्याप्रमाणे पण हे संपूर्णच बांधकाम नगरपंचायतीकडून एक इंच ही जागेचं परमिशन न घेता बांधण्यात आलेआहे. या रस्त्यामधून एखादी कार गाडी जात असताना एक मोटर सायकल ही पास होत नाही या संबंधात नगरपंचायतीला वेळोवेळी कळवूनही या बांधकामात बांधकामाचे काम चालू असताना कोणतीही कारवाई केलेले नाही सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे हे बांधकाम संपूर्ण जमीन दोस्त करावयास हवे. या ठिकाणी लोकायुक्त ज्याप्रमाणे स्पॉट इन्स्पेक्शन करतात त्याचप्रमाणे जिल्हा लोकायुक्त अधिकाऱ्याने हे स्पॉट इन्फेक्शन करून तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या तिथे समज द्यावा.अशी तक्रार समाज सेवक जयंत तिनेईकर यानी गुरूवारी तालुका पंचायतीच्या सभागृहात आयोजित बेळगाव लोकायुक्त जन संपर्क सभेत केली.
याव्यासपिठावर बेळगाव लोकायुक्त एस पी प्रसन्ना देसाई,डी.वाय.एस पी.बी एस पाटील,तालुका पंचायत ई ओ.रमेश मेत्री,एसीएफ श्रीमती निंबर्गी,व उपतहसीलदार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालुन केले.
या वेळी समाज सेवक जोतिबा भेंडीगीरी यानी लोकायुक्तांच्याकडे चार तक्रारी मांडल्या.मास्केनट्टी गावात विधुत दिप,पाणी पुरवठा खर्च न राबविताच बिले काढली.
मास्केनट्टी ते भुरूणकी संपर्क रस्ता न करताच बीले काढली. भुरूणकी ग्राम पंचायत व्यापतीतील गटारी स्वच्छ न करताच बीले काढली. तर खानापूर तालुक्यातील काही ग्राम पंचायतीनी राॅयलिटी भरलीच नाही.अशा तक्रारी मांडल्या.
त्याचबरोबर करकट्टी गावच्या बसवराज हरिजन यानी एस सी एस टी समाजाच्या शेतीच्या तक्रारी मांडल्या.
यावेळी लोकायुक्त एस पी प्रसन्ना देसाई यानी तालुका अधिकार्यानी आँफिसामध्ये आलेल्या जनतेला सन्मानाने वागवा.सौजन्य ठेवा.असे सांगुन त्यांची प्रामाणिकपणे कामे करा.तालुका अधिकार्यानी आपली ओळख पत्र सोबत ठेवावे.अशा अनेक सुचना केल्या.
खानापुरात कित्येक दिवसानंतर लोकायुक्ताची जन संपर्क सभा आयोजित करण्यात आली. मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच तक्रारी होत्या.
लोकायुक्ताच्या सभेला नगरपंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट,बीईओ पी. रामाप्पा,आरोग्य अधिकारी डाॅ. महेश किवडसन्नावर, पशु खात्याचे अधिकारी मनोहर मोमीण,डेपो मॅनेजर संतोष,कृषी अधिकारी सतीश मा वी काई, त्याचबरोबर सीडीपीओ,अक्षरदासोह अधिकारी, तालुक्यातील सहा आर एफ ओ,व इतर अधिकारी उपस्थित होते.