#खानापूरच्या भाविकानी केला सीआरपीएफ युवतीचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील करंबळ गावचे सुपूत्र व माजी ग्राम पंचायत अध्यक्ष देवानंद घाडी व गावचे भाविक दरवर्षी प्रमाणे यंदा ही उत्तर भारत यात्रेचे आयोजन केले होते. यात्रेनिमित्त आयोध्येत श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी गेले असता आयोध्येत सुरेक्षेसाठी तैनात असलेल्या खानापूर तालुक्याच्या तीन लष्करी ( सीआरपीएफ) युवती सेवा बजावत असताना गणवेषात दि सुन आल्या. लागलीच चौकशी करताच
यामध्ये यडोगा गावची मयुरी मल्लापा आंदारे,गंगवाळची पुजा अशोक पाटील ,खैरवाडची अश्विनी निंगाप्पा पाटील यांचा समावेश होता. या लष्करी युवतीची भेट होताच खानापूर भाविकाना एक प्रकार आनंद झाला.राखीव पोलिस दलात भरती हो ऊन आयोध्यामधील श्रीराम मंदिर सुरक्षा पथकात कार्यरत आहेत.आज खानापूरच्या युवती देशातील अति संवेदनशील तसेच पवित्र धर्म स्थळाचे संरक्षण करण्याचे भाग्य त्याना मिळाल्याचे दिसुन आले.
खानापूर तालुक्याच्या तीन्ही ही लष्करी युवती लष्करी वर्दीत सेवा बजावत असताना त्याच्या चेहर्यावर कर्त्यव्याचा आनंद पाहुन सगळेच भाविक भावुक झाले.
यावेळी देवानंद घाडीसह उपस्थित भाविकानी भेटी दरम्यान तीन ही लष्करी युवतीचा शाल, पुष्प हार, भेटवस्तू देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

