#चापगांव मराठी शाळेचा शतकमहोत्सव सोहळा उत्साहात प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अलिकडे शहरापासुन खेड्यापर्यत सगळीकडेच इंग्रजी शाळेचे ओढ लागुन
रा हि ली आहे.त्यामुळे त्यामुळे इंग्रजी शाळेचे फॅड सरास लोकांच्या डोक्यात घुसल्याने मराठी शाळातील पट संख्या कमी होत आहे. तेव्हा मराठी माणसानी आपली मुल मराठी शाळेला पाठवून मराठी शाळा टिकविण्याचा प्रयत्न केला तरच मराठी शाळा टिकतील , व मराठी शाळांचे शतक महोत्सव सोहोळे साजरा करण्याचे भाग्य मराठी माणसाला मिळतील. असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यानी चापगांव (ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शतक महोत्सव सोहळ्यात बोलताना व्यक्त केेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शतकमहोत्सवी कमिटीचे अध्यक्ष विलास धबाले होते.
या वेळी बोलता ना आमदार म्हणाले की, खानापूर तालुक्यातील खास करून मराठी शाळाच्या प्रगती साठी सरकारकडुन जादा निधी मिळवून मराठी शाळाचा कायापालट करण्यासाठी माझा सतत प्रयत्न आहे.
अवरोळी रूद्रस्वामी मठाचे चन्नबसव देवरू यांच्या सानिध्यात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात माजी आमदार दिगंबर पाटील यांनी ग्रंथ दिंडीचे उदघाटन करून केले. तर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते नूतन शाळा इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.तर शामियाना उदघाटन खानापूर को.आँप बॅकेचे चेअरमन अमृत शेलार यांच्या हस्ते तर शुध्द पाणी कुंभाचे उदघाटन गोपाळ देसाई,स्मार्ट क्लासरूमचे उदघाटन उद्योजक किसनराव गोदी , निरंजन सरदेसाई यांच्याहस्ते करण्यात आले .
यावेळी दीप प्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर,चन्नबसव देवरू,म.ए.समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील ,भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई,माजी ता.प सदस्य बाळासाहेब शेलार, म ए समिती नेते प्रकाश चव्हाण,माजी सभापती नामदेव कुटवड आदीच्या हस्ते करण्यात आले.
विविध फोटोचे पुजन डी एम भोसले, म ए समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, निवृत्त मुख्याध्यापक भालचंद्र पाटील, उद्योजक नामदेव कदम,नारायण पाटील,भाजपा बेळगाव जिल्हा उपाध्याक्ष प्रमोद कोचेरी,मा जी तालुका भाजपा अध्य़क्ष संजय कुबल आदीच्या करण्यात आले.
या वेळी प्रस्तावित मुख्याध्यापक महेश कवळेकर यानी केले.
तर उपस्थित पाहूण्याचा सत्कार शाल, पुष्प हार व मान चिन्ह दे ऊन करण्यात आला.
यावेळी शत पर्व स्मरणीकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मा जी शिक्षकांचा शाल,पुष्पहार व मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा जी सभापती सयाजी पाटील, म.ए.समितीचे नेते विलास बेळगावकर, माजी जि.प. सदस्य जयराम देसाई,सौ.मालिनी बाली,आदी मान्य वर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद पाटील यानी केले.तर आभार यल्लापा कुकडोळकर यानी मानले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी शतक महोत्सवी समिती ,मा जी विद्यार्थी,एस डी एम सी कमिटीच्यावतीने सदस्यानी विशेष परिश्रम घेतले.

