#बंदचा खानापूर व्यापारीवर्गातुन निर्णय!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या आँक्टोंबर महिण्यापासुन खानापूर शहरातर्गत मराठा मंडळ डिग्री काॅलेज ते करंबळ क्राॅस पर्यतच्या रस्त्याच्या काॅक्रीटीकरणाचे काम अंत्यत संथ गतीने सुरू असल्याने खानापूर शहरातील सर्व उद्योग व्यवसाय पुर्णपणे कोलमडले आहेत.या बाबत वारंवार मागणी करून कामाचे योग्यप्रकार नियोजन करण्यात येत नसल्याने तसेच फिश मार्केटजवळील सीडीचे व रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ,अयोग्य पध्दतीने करण्यात आले.त्यातच रस्ता पूर्णपणे अडवून काम करण्यात आले आहे.त्यामुळे वाहतुक बंद झाली आहे.दुचाकीस्वार ,पदचारी जीवाच्या भितीने ये जा करत आहेत.यामुळे शहरातील व्यापारीवर्गावर परिणाम झाला आहे.
रस्त्याच्या व सीडीच्या संदर्भात तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे असल्यास संबधीत खात्याने व कंत्राटदारानी पर्यायी मार्ग तयार करावा. हे विचारात न घेताच काम करणे कायद्याच्या विरूद्ध आहे.
यावर लवकरता तोडगा काढुन व्यापारीवर्गाचे नुकसान थांबवावे.या मागणीसाठी गुरूवारी दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढुन व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसीलदाराना निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करून मोर्चाला सुरूवात होणार आहे. तेथून डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालुन मोर्चा शिवस्मारक चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प हार घालुन शिवस्मारक चौकात मानवी साखळी करून रास्तारोको करून तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त करून तहसीलदाराना निवेदन देण्यात य़ेणार आहे. अशी माहिती व्यापारी संघटनेचे नेते महांतेश राऊत यानी मंगळवारी दि.२४ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांध काम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी महांतेश राऊत,बसवराज होंदडगट्टी,प्रदीप शेट्टी,शिवशंकर कट्टीमनी ,रमेश जैन,आदर्श राऊत,आदित्य कलाल,शिवा सुळकर,राहुल पोळ,एफ.एम पाटील,महमद नंदगडी,मुक्तार काजी,मनोज रेव्हणकर,सागर उप्पीन,अभिषेक शहापूरकर,अशोक किनगी,राहुल पाटील आदी शेकडो व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

