#कार्यकरणीच्या अध्यक्षपदी डाॅ. डी.ई.नाडगौडा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
अखंड हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र जयंतीचे औचित्य साधुन खानापूर शहारातील समर्थ इंग्लिश मिडीय स्कूल मध्ये गुरूवारी दि. १९ रोजी रक्तदान, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी नागरिक शिष्टाचार व आरोग्यदायी जीवनशैली मार्गदर्शन, योग कार्यक्रम, नशामुक्ती अभियान तसेच इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रस्थानी असलेल्या आरोग्य भारती च्या खानापूर शाखेच्या नव्या कार्यकारिणी समितीची घोषणा आयोजित सभेत करण्यात आली होती.
सभेच्या अध्यक्षस्थानी
प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. डी. ई. नाडगौडा उपस्थित होते. या वेळी सभेत आरोग्य भारती कार्यकरणी सभेत पदाधिकार्याची निवड करण्यात आली.
या वेळी आरोग्य भारती खानापूर शाखेच्या कार्यकरणी अध्यक्षपदी डाॅ.डी.ई.नाडगौडा तर उपाध्यक्षपदी डॉ. सुदर्शन सुळकर, तर महिला घटक प्रमुख डॉ. परिणीती देसाई तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रसिद्ध दंतवैद्य डॉ. राधाकृष्ण हार्वाडेकर, सदानंद कपिलेश्वरी, अमोल शाहापूरकर, रमेश जैन आणि एफ एम पाटील यांची नियुक्ती करून त्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
आरोग्य भारतीच्या कर्नाटक उत्तर प्रांताचे उपाध्यक्ष वासुदेव इनामदार यांनी नव्या समितीतील सर्व सदस्यांचे स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. व आरोग्य भारतीची ध्येय-धोरणे स्पष्ट केली.
कार्यक्रमाची सुरुवात ओंकार व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी बोलताना अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा म्हणाले की, खानापूर येथे येत्या काळात विविध फलदायी उपक्रम राबवून सामाजिक जनजागृती करण्यात येईल, असे सांगितले.
लक्ष्मण शेट्टी यांनी आभार मानले.
