#गुंजीच्या आकाश बांदोडकरचे प्रयत्न!
संदेश क्रांति न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गुंजी गावचा सुपूत्र वैभव सुतार याचा दि .७ फेब्रुवारी रोजी अपघातात झाला . या आपघातात वैभव अरुण सुतार हा गंभीर जखमी झाला होता. वैभवची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महागडे उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम उभी करणे त्याच्यासाठी कठीण होते. त्यावेळी गावातील दानशूर व्यक्तींनी, काही मंडळांनी तसेच गोवा व महाराष्ट्र येथूनही मदतीचा ओघ सुरू झाला.
या वेळी गुंजी येथील कै.मा जी सैनिक वसंत बांदोडकर याचे सुपूत्र आकाश बांदोडकर याना वैभवच्या उपचाराला किती खर्च आला होता हे आकाश याला माहिती असल्याने त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देईना.
आकाश ज्या कंपनीत काम करतो, त्या AROBINDO PHARMA FOUNDATION या बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांनी वैभवच्या अपघाताबाबत व त्याच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. आकाशच्या शब्दाला मान देत कंपनीने वैभव सुतार यांच्या आईच्या खात्यावर 3,50,000 रुपये जमा केले. आकाश बांदोडकर याच्या भावनांचा आदर करून कंपनीने दिलेल्या या मोलाच्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार मानले .तसेच आकाश बांदोडकर यानीही कंपनीच्या माध्यमातून मोठी मदत उभी करून दिल्याबद्दल आकाश बांदोडकरच्या मदतीचे खानापूर तालुक्यातुन कौतुक केले जात आहे.असाच सर्वाकडुन मदतीचा हात वैभव सुतारला मिळाला तर वैभव सुतारच्या उपाचाराला मदत होईल.