हजारो भक्तानी घेतला महाप्रसादाचा लाभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सा ला बाद प्रमाणे यंदा ही असोगा ( ता. खानापूर ) येथील मल प्रभा नदीच्या काठावर असलेल्या पवित्रक्षेत्र रामलिंगेश्वर मंदिरात दोन दिवस चालेल्या महाशिवरात्रीच्या सन् निमित्त सोमवारी दि.१६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खानापूर श हरा सह तालु क्या च्या अनेक खेड्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकानी सकाळपासुन मलप्रभा नदीवर मोठी गर्दी केली होती. यावेळी नदी वर पुजा आर्चा करण्यात आली.येथील रामलिंगेश्वर मंदिरात भाविकानी दर्शन घेऊन हजारोंच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
दुपार पासुन सायंकाळ पर्यत भाविकानी महाप्रसादासाठी उपस्थिती लावली होती.
