संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सरकारी पदवी पूर्व काॅलेजचे स्नेहसंमेलन, १२ वी विद्यार्थ्याना निरोप, रोटरी क्लब आँफ बेळगाव साऊथ यानी दान केलेल्या शुध्द पिण्याच्या पाण्याच्या युनिटचे उदघाटन तसेच नवीन सभागृहाचे उदघाटन असा संयुक्त कार्यक्रम शनिवारी दि.७ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस के अकिवाटा उपस्थित राहणार आहेत.
यावेऴी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते सभागृहाचे उदघाटन होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम एम कांबळे, उपनिर्देश शिक्षण खाते, एन बी शिरशाड प्राचार्य सरस्वती पी.यू .काॅलेज शहापूर,एम. के. भजंत्री,प्राचार्य पी.यू काॅलेज नंदगड,आदी उपस्थित राहणार आहेत.
शुध्द पिण्याच्या पाण्याचे उदघाटन डाॅ.गोविंद मिसाळे,अध्यक्ष रोटरी क्लब
बेळगाव साऊथ यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी सरकारी पी.यू. काॅलेज समितीचे उपाध्यक्ष पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमाला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

