#कार्यक्रमास खासदारसह आमदार नेते व अधिकार्याची दांडी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील नविनच सुरूवात करण्यात आलेल्या श्री शिवबसव मती मंद विद्यार्थ्याच्या अंगविकल दिनानिमित्त रेल्वेस्टेशन रोडवरील समुदाय भवनात. मंगळवारी दि.२७ रोजी आयोजित कार्यक्रमास खानापूर तालुका आमदारासह, खासदार, विविध पक्षाच्या नेत्यांची व तालुका अधिकार्यानी दांडी मारल्याने नगरसेवक लक्ष्मण मात्र यानी आपल्या भाषणात खासदार ,आमदारासह विविध पक्षाच्या नेत्यासह अधिकार्याचा निषेद व्यक्त केला.
या वेळी ते पोट तिटकीने ते म्हणाले कि, लोकप्रतिनिधी केवळ निवडणुक डोळ्यासमोर ठेवून लोकाना आश्वासने देतात.निवडुन आल्याबरोबर आपले खरे रूप दाखवून जनेतेची दिशाभूल करण्यात खानापूर तालुक्याचे आजी माजी प्रतिनिधि व नेते मंडळी समाधान मांडतात.
,त्यामुळे सर्व सामान्य जनतेची फसवणुक होते.अशा नेत्याना त्याची जागा जनतेनेच दाखवून देण्याची गरज असल्याचे मत
मती मंद विद्यार्थ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंतीमंद शाळेचे संस्थापक ,चेअरमन अनिल सावंत होते.
व्यासपिठावर ई आर टी अधिकारी एस एन कम्मार, राष्ट्रपती पदक विजेता कलाकार पुंडलिक कुंभार,डी बी पाठक विजयुकुमार कांबळे,राजू खातेदार,भाजप नेते संजय कुबल, अपंग क्रीडापटू महांतेश होंगल,सुरेश शिंदे,सुरेश सिंगे,प्रिया पाटील, शिवाजी मादार आदी उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांचे स्वागत अनिल सावंत यानी पुष्पगुच्छ देऊन केले.तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन. व फोटो पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन राष्ट्रपती पदक विजेते पुंडलिक कुंभार व यांचा शाल , पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी एस एन कम्मार, डी बी पाठक , भाजप नेते संजय कुबल ,खातेदार आदीनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील मतीमदंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

