पीडीओ विरोध्दात मुख्य #लोकायुक्तांच्याकडे रितसर तक्रार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी (ता. खानापूर ) ग्राम पंचायती च्या हद्दीतील सर्वे नंबर ७१/२ मधील मालक रेव्हणसिध्दया हिरेमठ यांच्या मालकीच्या प्लाॅटचे उत्तारे देण्यास हलकर्णी ग्राम पंचायतीच्या पीडीओ रेष्मा पाणीवाले या चाल ढकल करत आहे. त्याच्या कार्य पध्दतीला कंटाळुन मालक रेव्हणसिध्दया हिरेमठ यानी अँड. एच .एन. देसाई व अँड.ईश्वर घाडी यांच्याकडे केस दाखल करून मुख्य लोकायुक्त यांच्या तक्रार दाखल केली.
तक्रारीत मालक रेव्हणसिध्दया हिरेमठ याचे म्हणने आहे कि,हलकर्णी ग्राम पंचायत हद्दीतील सर्वे नंबर ७१/२ मधील एन ए असलेल्या प्लाॅटचे उत्तारे देण्यास गेल्यावर्षभरा पासुन हलकर्णी ग्राम पंचायती च्या पीडीओ रेष्मा पानीवाले या चाल ढकल करत आहेत.एवढेच नव्हेतर या आदीच्या पीडीओ नी मला या प्लाॅटचे उत्तारे दिले आहेत.प्लाॅट एन ए झाले आहेत.असे असुन उत्तारे देण्यास चालढकल का करतात.
या कारणाने मालक रेव्हणसिध्दया हिरेमठ यानी अँड.एच एन देसाई, व अँड ईश्वर गाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पीडीओच्या अनेक असल्याने मुख्य लोकायुक्त यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
मालक रेव्हणसिध्दया हिरेमठ याना उत्तारा मिळत नसल्याने त्याना मानसिक त्रास होत असुन त्याच्या कामात अडचण निर्माण होऊन त्याना आर्थिक नुकसान होत आहे. अली माहिती त्यानी दिली आहे.