संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चापगाव ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शतक महोत्सव समिती व शाळा सुधारणा समिती तसेच शिक्षक यांची शतक महोत्सवाची तारीख निश्चित करण्यासाठी महत्त्वाची बैठक मंगळवारी दि.२० रोजी पार पडली.
बैठकीत सध्या शाळेत चालू असलेली विकास कामे लक्षात घेता ती पूर्ण होण्यासाठी अजून पंधरा-वीस दिवसाचा कालावधी आवश्यक असून सर्व विकास कामे पूर्ण करून येत्या दि.२५ व दि.२६ फेब्रुवारी रोजी शतक महोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या सभेसाठी महोत्सव कमिटीचे श्री विलास धबाले, श्री मष्णू चोपडे, श्री नारायण देसाई (शिओली), श्री एन. व्ही.पाटील सर (शिओली),श्री रमेश धबाले, श्री. मल्लाप्पा मारीहाळ,श्री उदय पाटील, श्री सुभाष तोरगल(अल्लेहोळ), श्री यल्लाप्पा कदम, श्री विष्णू बेळगावकर,श्री बशीर सनदी, श्री पांडुरंग पाटील,श्री जयदेव अंबाजी, श्री नागराज धबाले, श्री नामदेव तोरगल(अल्लेहोळ), श्री. लक्ष्मण तुकाराम पाटील, श्री अभिजीत पाटील , श्री भरमानी जिवाई, श्री बळवंत परशराम पाटील ,श्री शिवाजी कुऱ्हाडे,श्री यल्लाप्पा कुकडोळकर,सौ. नम्रता नारायण पाटील, सौ ज्योती यल्लाप्पा धबाले, सौ आरती सुरेश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश कवळेकर, सहशिक्षक श्री एन.एन.अरेर सर* इत्यादी उपस्थित होते.

