#निलावडे ग्रा.प.सदस्य विनायक मुतगेकर यांचे प्रयत्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
निलावडे ग्राम पंचायतीच्या क्षेत्रातील कांजळे गावात ग्राम पंचायत सदस्य व खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष. विनायक मुतगेकर यांच्या प्रयत्नातुन नरेगा योजनेतुन ५ लाख रूपये निधीतुन कांजळे गावच्या मराठी शाळेपासुन गावात फेव्हर्स काम करण्यात आले.
या विकास कामामुळे कांजळे गावातुन ग्राम पंचायत सदस्य व खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर याचे कौतुक होत आहे.
# हर सन वा डी ते कांजळे रस्त्याच्या सीसीरोडचे काम पूर्ण!
खानापूर जांबोटी महामार्गावरील हरसनवाडी ते कांजळे रस्त्यावर आमदार फंडातुन १० लाख रूपये निधी मंजुर करून सी सी रोडचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हरसनवाडी, कांजळे गावच्या प्रवाशातुन , नागरीकातुन समाधान पसरले आहे.


