निलावडे ग्रा.पं.सदस्य विनायक मुतगेकर , पीडीओ श्री मोकाशी, राजू धुरी यांची उपस्थिती!
खानापूर प्रतिनिधी
कबनाळी ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या पडक्या खोलीची पाहणी मंगळवार दि.६ रोजी बीईओ पी रामाप्पा यानी कबनाळी शाळेला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बीईओ पी. रामाप्पा यांच्या समवेत खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष व निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य विनायक मुतगेकर ,ग्राम पंचायत पीडीओ श्री मोकाशी , राजू धुरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक बापू दळवी यानी विद्यार्थी समवेत बीईओ पी रामप्पा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी गेल्या ४० वर्षापूर्वी बांधण्यात आलेली कौलारू खोली कोसळुन धोक्याची झाली आहे.
या शाळेच्या खोली ज्या परीसरात मुल खेळत असतात.तेव्हा कर्मधर्म योगाने चुकून खोलीची भिंत, कैसे विद्यार्थ्याच्या अंगावर पडुन धोका पत्करण्याचा संभव आहे.
तेव्हा खोली जमिन दोस्त करून धोका टाळावा अशी मागणी विनायक मुतगेकर यानी केली.
या वेळी बीईओ पी रामाप्पा यानी खोलीची पाहणी करून खोली जमीन दोस्त करू. असे आश्वासन दिले.
जंगल भागातील कबनाळी शाळेची स्वच्छता, विद्यार्थ्याची हुशारी पाहुन व कबनाळी शाळेचा परिसर पाहुन बीईओ पी रामाप्पा यानी समाधान व्यक्त केले.