संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
उपाध्यक्ष बेळगांव जिल्हा ग्रामीण व भाजप जेष्ठ नेते श्रीमान प्रमोद सूर्यकांत कोचेरी यांचा शुक्रवारी होणार्या वाढदिवसा निमित्त परिचय ……
मुळचे कोडचवाड ( ता.खानापूर ) व खानापूरचे भाजप जेष्ठ नेते श्री प्रमोद कोचेरी हे जनप्रिय नेतृत्व असलेले गरीब नागरीकाच्या आडचणीच्या वेळी नेहमीच सहकार्य करून लोकांच्या आडचणी दुर करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
गेली ३० वर्षे भारतीय जनता पक्षासाठी सतत कार्यरत अस ले ले भाजपचे जेष्ठ ने ते श्री प्रमोद कोचेरी हे खानापूर तालुका भाजप अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.तसेच बेळगाव जिल्हा जनरल सेक्रेटरी पदभार सांभाळला आहे. तर तीन वेळा बेळगांव जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष पद सांभळले आहे. सध्या ते विद्यामान भाजप बेळगाव जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
खानापूर तालुका भाजप पक्षाची धुरा सांभाळत खानापूर तालुक्याच्या विकासासाठी गेली ३० वर्षे ते कार्यरत आहेत.
गेली अनेक वर्षे तालुक्यातील खेडोपाडी जा ऊन विविध समस्या सोडविल्या. बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील हलकर्णी, खानापूरसह विविध गावच्या शेतकर्याच्या समस्या त्यानी सोडवुन दिल्या आहेत.
त्यानी भाजप पक्षाच्या प्रगतीसाठी नेहमीच नेेते , कार्यकर्त्याच्या पाठीशी राहुन भाजप पक्ष वाढविला आहे.त्यामुळे खानापूर तालुक्यात दोन वेळा भाजप पक्षाचा आमदार होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.एवढेच नव्हेत कार वार मतदार संघातुन खासदार करण्यासाठी खानापूर तालुक्यातुन उचांकी मतदान करण्यात त्याचे प्रयत्न सार्थकी ठरले आहेत.
खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याच्या सदैव पाठीशी!
खानापूर तालुक्यात भाजप पक्षाला बळकटी मिळावी.यासाठी भाजपचे जेष्ठ नेते प्रमोद को चेरी हे नेहमी कार्यकर्त्याच्या पाठीशी राहुन पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात जातीने लक्ष देऊन कार्यक्रमाचे आयोजन करतात.त्यात त्यांचा हातखंडा आहे.
कार्यकर्त्याच्या आडीअडचणीत ते नेहमी पुढाकार घेऊन मदतीचा हात देतात.
असे भाजपचे जेष्ठ नेते श्रीमान प्रमोद कोचेरी याना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !



