#दोन पॅनल आमने सामने!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चापगाव (ता.खानापूर ) येथील पी के पी एस सोसायटी च्या पंच वार्षिक सोसायटी ची निवडणुक रविवारी दि. ४ जानेवारी रोजी होत आहे.
यापंचवार्षिक निवडणुकीत चापगाव पी के पी एस सोसायटीसाठी दुरंगी लढत होत आहे.यामध्ये अरविंद पाटील पॅनल विरूद्ध शेतकरी सहकार पॅनल अशी लढत हो मार असुन या निवडणुकीत अरविंद पाटील पॅनल. मधुन सामान्य कर्जदार पुरूष गटातुन अशोक मष्णू बेळगावकर, उदय मनोहर पाटील,भरमाणी टिक्कापा जिवाई,रूद्राप्पा मुदकाप घार्शी,सागर जिवाप्पा कडबी, तर शेतकरी सहकार पॅनल मधुन परशराम कल्लापा यळगुकर,बाबूराव पुंडलिक पाटील,मष्णू सा तेरी बीर्जे,रमेश शिवाप्पा घार्शी, लक्ष्मण तुकाराम पाटील हे निव़डणुक लढवित आहेत.
परिशिष्ट जाती कर्जदार गटातुन मल्लापा यल्लापा मादार यांच्या विरोध्दात शिवाजी बसाप्पा मादार हे निवडणुक लढविणार, सामान्य महिला कर्जदार गटातुन द्राक्षायणी हणमंत पाटील व लक्ष्मी फोडु अंबोजी यांच्या विरोध्दात भारती जोतिबा कुर्हाडे व महादेवी नारायण गोवी या निवडणुक लढवित आहेत.
सामान्य कर्जदार पुरूष ब गटातुन बसापा कल्लापा अंगडी विरूद्ध पिराजी मष्णू कुर्हाडे हे निवडणुक लढवित आहेत.
तसेच सामान्य बिन कर्जदार पुरूष गटातुन गोविंद यल्लापा धबाले विरूद्ध कृष्णा पुंडलिक पाटील याच्यात लढत होणार आहे.
चापगांव गावच्या पी के पी एस सोसायटीची यंदाची पंचवार्षिक निव़डणुक ही प्रतिष्ठेची होणार आहे. एकीकडे मा जी आमदार व डी सी सी बेॅकेचे संचालक अरविंद पाटील यानी पॅनल उभारून विरोध काना एक आवाहन दिले आहे.
त्यामुळे अरविंद पाटील पॅनल विरूद्ध शेतकरी सहकार पॅनल अशी रंगत लढत हो मार आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याचे लक्ष यंदाच्या चापगांव पी के पी एस सोसायटी च्या पंच वार्षिक निव़णुकीकडे लागुन रा हि ले आहे.

