#सोमवारच्या घटनेत जळगे व हत्तरवाड शिवारातील उसाचे लाखो रू. नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जळगे ( ता.खानापूर ) गावच्या शिवारात सोमवारी दि. २९ रोजी ऊसाच्या फडाला शार्टसर्किटने आग लागुन जवळ १००० टन उस आगीत जळुन खाक झाला.त्यात शेतकर्याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले.
ऊसाच्या फडाजवळ विधुत पुरवठा करणार्य़ा ट्रान्सफार्मर जवळ शाॅर्टसर्किट झाल्याने अचानक आगीची ठिणगी पडली. आणि लागलीच उसाला आग लागली.आणि बघता बघता आगीने रूद्र अवतार घेतला.त्यातच जोराचा वारा सुटला.त्यामुळे आग सर्वत्र पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.मात्र शिवा रात ओलावा असल्याने अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळा पर्यत जाण्यास अनेक आडचणी आल्या खूप उशीर झाला.तो पर्यत हजारो टन ऊस जळुन खाक झाला.
त्यामुळे शेतकर्याला लाखो रूप याचे नुकसान झाले.
ही घटना ताजी असतानाच सोमवारी सायंकाळी हत्तरवाड ( ता.खानापूर) गावचे शेतकरी रमेश निळकंठ. गावड़ा याच्या शेतातील ऊस पिकाला शाॅर्टसर्किटमुळे लाग लागुन जवळ पास ५० टन ऊस जळून खाक झाल्याची घटना एकाच दिवशी घडली.
दोन्ही ठिकाणी हेस्काॅम खात्याच्या ट्रान्सफार्मरच्या शाॅर्टसर्किट मुळे आग लागल्याचे दिसनु ये त आहे. यामुळे शेतकर्याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
तेव्हा लोकप्रतिनिधीनी नुकसान ग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाई मिळवुन द्यावी.अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
