#खानापूरात मराठा समाजाची चिंतन बैठक संपन्न !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मराठा समाजाची उन्नति व्हायची असेल तर विचार चिंतन बैठक होने काळाची गरज आहे.तरच मराठा समाज एकवटेल समाजाची प्रगति होईल.तेव्हा खाना पू रात प्रथमच मराठा समाजाची चिंतन बैठक होत आहे.याचा मला सार्थ अभिमान वाटतो.तेव्हा अशा चिंतन बैठका होऊन खाना पू रात एक दिवस मोठा महामेळाव्याचे आयोजन होईल .असे विचार अखिल भारतीय मराठा समाजाचे व गोसावी मठ बेंगलोरचे मठाधिश प.पू.श्री.मंजुनाथ भारती स्वामीजी यानी सोमवारी दि. २९ रोजी सायंकाळी मल प्रभा नदी काठी हरेकृष्ण मंदिरात आयोजित खानापूर तालुका मराठा समाज चिंतन बैठकीत व्यक्त केले.
या वेळी व्यासपिठावर आमदार विठ्ठल हलगेकर , मा जी आमदार अरविंद पाटील, गुरू कुलचे अध्यक्ष शंकर बेळगावकर आदी उपस्थित होते.
या वेळी प्रास्ताविक दिलीप पवार यानी केले. स्वागत पंडित ओ गले यानी केले.
प्रारंभी जगतगुरू प.पू.श्री.मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा खानापूर मराठा समाजाच्यावतीने भगवा फेटा, पुष्पहार, व फळे दे ऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी आमदार विठ्ठ ल हलगेकर, म्हणाले कि खानापूर तालुक्यात मराठा समाजाची लाखाहुन अधिक लोक संख्या आहे.परंतु मराठा समाज सगळीकडे विखुरला गेला आहे.सर्व मराठा समाज एकाच छ ता खाली ये ऊन मराठा समाजाच्या उन्नतीसाठी उभा रा हि ला तर, नक्कीच मराठा समाजाची उन्नती होण्यास वेळ लागणार नाही.
आम दार अरविंद पाटील, म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासुन मराठा समाज एक वट ला नाही.त्यामुळे मराठा समाज एका छता खाली आला नाही.त्यामुळे मराठा समाजाची शैक्षणिक क्षेत्रात म्हणावी तशी प्रगति होत नाही. विद्यार्थ्याना उंच शिखराव ण्यायचे असेल मराठा समाजाची चिंतन बैठक झाली पाहिजेत.
खानापूर वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी म्हणाले की, गा वो गा वी मराठा समाजाला एकत्रीत करण्यासाठी चिंतन बैठकीचे आयोजन केले तर मराठा समाज एकत्रीत होईल.यासाठी माझ्याकडुन खानापूर मराठा समाज संघटने साठी ५,००१ रूपयाची देणगी जाहिर केली.
यावेळी संजय कुबल , मा जी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमानी, प्रकाश चव्हाण , गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील,दशरथ बनोशी, पंडित ओगले आ दी नी मराठा समाजाच्या सर्वागीन विकासाबद्दल विचार व्यक्त केले. बैठकीला खानापूर तालुक्यातील मराठा समाजाचे नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आबासाहेब दळवी यानी केले.तर आभार सदानंद पाटील यानी मानले.
