#खानापूरात मराठा समाजाचीचिंतन बैठक संपन्न !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
अखील भारतीय मराठा समाजाचे व गोसावी मठ बेंगलोरचे मठाधिश प.पू.श्री.मंजुनाथ भारती स्वामीजी यानी सोमवारी दि. २९ रोजी सायंकाळी मल प्रभा नदी काठी हरेकृष्ण मंदिरात आयोजित खानापूर तालुका मराठा समाज चिंतन बैठकीत मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
या वेळी खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाटी यानी पुष्पहार घालुन स्वागत केले.
या वेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मराठा समाजाची उन्नति व्हायची असेल तर विचार चिंतन बैठक होने काळाची गरज आहे.तरच मराठा समाज एकवटेल समाजाची प्रगति होईल.तेव्हा खाना पू रात प्रथमच मराठा समाजाची चिंतन बैठक होत आहे.याचा मला सार्थ अभिमान वाटतो.तेव्हा अशा चिंतन बैठका होऊन खाना पू रात एक दिवस मोठा महामेळाव्याचे आयोजन होईल .असे विचार अखिल भारतीय मराठा समाजाचे व गोसावी मठ बेंगलोरचे मठाधिश प.पू.श्री.मंजुनाथ भारती स्वामीजी यानी खानापूर तालुका मराठा समाज चिंतन बैठकीत व्यक्त केले.
व्यासपीठावर आमदार विठ्ठल हलगेकर , मा जी आमदार अरविंद पाटील, गुरू कुलचे अध्यक्ष शंकर बेळगावकर आदी उपस्थित होते.
या वेळी प्रास्ताविक दिलीप पवार यानी केले. स्वागत पंडित ओ गले यानी केले.
प्रारंभी जगतगुरू प.पू.श्री.मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा खानापूर मराठा समाजाच्यावतीने भगवा फेटा, पुष्पहार, व फळे दे ऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी आमदार विठ्ठ ल हलगेकर, माजी आम दार अरविंद पाटील, खानापूर वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, संजय कुबल , मा जी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रोमानी, प्रकाश चव्हाण , गोपाळ देसाई, दशरथ बनोशी, पंडित ओगले आ दीची भाषणे झाली.

