संदेश क्रांती न्यूज:
सन्नहोसुरचे जेष्ठ स्वातंत्रसैनिक दत्तू पाटील यांचे निधन
खानापूर प्रतिनिधी
सन्नहोसुर ( ता.खानापूर) गावचे जेष्ठ नागरिक व स्वातंत्र सैनिक दत्तू कल्लापा पाटील ( वय.,९५) यांचे गुरूवारी दि.२५ डिसेंबर रोजी वार्धक्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना , नातवंडे, पणंतवंडे असा परिवार आहे.
त्यांचे अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी ११वाजता सन्नहोसुर स्मशानभुमीत होणार आहेत.
तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांचे ते आजोबा होत.