संदेस क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न कै.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दीनिमित्तीचे औचित्य़साधुन गुरूवारी दि.२५ रोजी शेडेगाळी ( ता.खानापूर ) जवळील शेडेगाळी हाॅल्टीक्लचर फार्म मध्ये खानापूर तालुका भाजपच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी अँड.चेतन मनेरीकर यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले. व बोलताना ते म्हणाले की,,भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामागे मोलाचा वाटा असुन भारत देशाच्या उभारणीत दिलेले योगदान मोठे आहे.तेव्हा कै.अटल बिहारी वाजपेयी याना अभिवादन म्हणून शेडेगाळी हाॅल्टीक्लचर फार्म मध्ये वृक्षरोपण कारण्याचे नियोजन केले आहे.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते काजु झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाला भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी , अँड. चेतन मनेरीकर, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, भाजप ने ते राजेंद्र रायका, सदानंद पाटील ,चांगापा निलजकर, मोहन पाटील, बबन अल्लोळकर,प्रशांत लकेबैलकर, किशोर हेबाळकर व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

