#५वर्षा खालील सर्व मुलांना लसीचे दोन थेंब!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सोमवारी दुसर्या दिवशी ही खानापूर शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमांतर्गत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला बालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
खानापूर श हरा सह तालुक्यात गा वो गा वी ५ वर्षा खालील मुलाना पोलिओ डोस न चुकता घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकार डॉ.महेश किवडसन्नावर , यानी केले आहे.
यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश किवडसन्नावर म्हणाले की,खानापूर तालुक्यात एकूण १६हजार ५०८ बालकाना लसीकरणाचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे.
या सा ठी १३५ लसीकरण केद्रे उघडण्यात आली आहे.तसेच लसीकरणासाठी २८३ पथके कार्यरत आहेत.
या वेळी ऊसतोड कामगाराच्या बालकाना , वीटभट्टी कामगारांच्या बालकांना, तसेच बांध काम क्षेत्रातील कामगारांच्या बालकाना पोलिओपासुन संरक्षण मिळावे.यासाठी विशेष दक्षता घेऊन लसीकरण करण्यात येईल . तेव्हा नागरीकाना याचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
